जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत सांगवीमुरा शाळेतील आर्यन शिंदेने मिळवले यश...

समीर झोरे 
प्रतिनिधी / मेढा (जावली)


मेढा : जावली तालुक्यातील डोंगर कपाऱ्यात असणाऱ्या सांगवीमुरा या गावातील विद्यार्थी आर्यन शिंदेने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत दणदणीत यश मिळवत प्रवेशासाठी पात्र ठरला असून त्याच्या या यशाने जावलीच्या डोंगर रानातून हिरा चमकलेचे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

डोंगर रानातून माळरान यातून अत्यंत अवघड असा प्रवास करावा लागणारा निसर्गाचे वरदान असणारे सांगवीमुरा गाव आणि त्या गावात असणारी जिल्हा परिषदेची पाचवीपर्यंतची शाळा आणि या ठिकाणी शिक्षणाचे धडे देत असणारी कार्यरत मुख्याध्यापक श्री बालाजी बोथेंगे गुरुजी आणि उपशिक्षक श्री राजेंद्र शेडगे यांनी अथक परिश्रम घेऊन शाळा नावारूपास आणली आहे, नुकताच जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून शाळेतील आर्यन शिंदे नवोदय विद्यालयात सहावीच्या वर्गात प्रवेशासाठी पात्र ठरला असून आर्यनच्या यशामुळे त्याचे आई-वडील नातेवाईक भारून गेले आहेत. 

परिसरातील सर्वांसाठी आर्यन कौतुकाचा विषय ठरला आहे यावेळी आर्यने मिळवलेल्या यशाबद्दल त्याची कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तुकाराम शिंदे गावच्या माजी सरपंच सौ सावित्रीताई शिंदे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ संगीता झोरे यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यकरीता शुभेच्छा दिल्या,आणि उपस्थित मुख्याध्यापक बालाजी बोथिंगे,उपशिक्षक राजेंद्र शेडगे यांचेही अभिनंदन केले तसेच विविध शैक्षणिक उपक्रम क्रीडा क्षेत्रातील यश नेहमीच अध्यापन तसेच वेळ देऊन राजेंद्र शेडगे गुरुजींनी मला मोडी डीपी ज्ञान देत असल्याचे सांगून त्यांच्या कार्याच कौतुक केले..


न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / मेढा (जावली)

Post a Comment

Previous Post Next Post