कोंडाई चॅरिटेबल ट्रस्ट पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न ; ह.भ.प.बाळकृष्ण महाराज शिंदे, जयश्रीताई जाधव यांना पुरस्काराने करण्यात आले सन्मानित

श्री.बजरंग चौधरी
प्रतिनिधी / मेढा (जावली) 

मेढा (जावली) : सातारा जिल्हा जावली तालुक्यातील तेटली गावात, कोंडाई चॅरिटेबल ट्रस्ट (रजि.) आयोजित पुरस्कार सोहळा २०२५ मोठया जल्लोषात आणि उत्साह वातावर्नात संपन्न झाला.
समाजामध्ये मध्ये आदर्श हिरे सामाजिक व राजकीय रत्न तयार व्हावे या संकल्पनेतून कोंडाई चॅरिटेबल ट्रस्ट (रजि.) यांच्या विद्यमाने समाजामध्ये सामाजिक , राजकीय, विविध क्षेत्रात भरीव आणि उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पुरुष / महिला यांच्या कार्याचा यथोचित गौरव करून त्यांच्या सन्मानार्थ कै. कोंडाबाई देवजी भोसले यांच्या स्मुर्तीप्रित्यर्थ कोंडाई सामाजिक पुरुष पुरस्कार आणि महिला पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
तसेच सालाबाद प्रमाणे याही वर्षी ट्रस्टने नामांकन केलेल्या गरजवंत व्यक्तीला किट ट्रस्टचे विश्वस्त, आणि उपस्थित मान्यवर याच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्याच बरोबर जिजामाता महिला मंडळ, तेटली आणि कोंडाई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी, कुंकू कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला. या कार्यक्रम ला प्रमुख पाहुणे ह. भ. प. श्री.धोंडिराम महाराज संकपाळ राम चरित्रमानस या ग्रंथाचे मराठी कथा अनुवादक, अध्यक्ष, ३२ गाव समाज सामाजिक संघटना. विश्वस्त, जावली तालुका वारकरी संघ.आणि संजय संकपाळ गुरुजी संचालक, प्राथमिक शिक्षक बँक सातारा. सचिव, ३२ गाव समाज सामाजिक संघटना इत्यादी उपस्थित होते.

या वर्षाचा "कोंडाई सामाजिक पुरुष पुरस्कार २०२५ "
सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. बाळकृष्ण महाराज शिंदे यांना ह. भ. प.धोंडीराम महाराज सकपाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सोबत संजय सकपाळ (गुरुजी)सर उपस्थित होते.
या वर्षाचा "कोंडाई सामाजिक महिला पुरस्कार २०२५" 
समाजसेविका सौ.जयश्रीताई तुकाराम जाधव यांना जिजामाता महिला मंडळ अध्यक्ष सौ.जनाबाई किसन भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सोबत सौ. आशा भोसले, सौ. अनिता भोसले सौ. शोभा भोसले उपस्थित होत्या. पुरस्कारचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रोख पारितोषिक असे होते.

या कार्यक्रमला कोयना, सोळशी, कांदाटी, सामाजिक विकास संस्थाचे पदाधिकारी सिताराम दादा जाधव उपाध्यक्ष, संदीप नलावडे सचिव, अण्णाबुवा शिंदे सावरी, विशाल शिंदे पाली, सचिन शेलार कोट्रोशी, सौ. नंदाताई शिंदे महिला संपर्क प्रमुख तसेच गणेश भोसले संचालक DMK जावली बँक, एकनाथ पाटील सरपंच केळघर (सोळंशी ) प्रकाश साळुंखे कोयना धरणग्रस्त संघटना अध्यक्ष, Adv विश्वास साळूंखे, संजय शेठे मेढा, सौ सिमाताई मालुसरे आणि पंचक्रोशी तील, गावातील जेष्ठ नागरिक, मान्यवर, विभागातील महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करून वातावरण प्रसन्न, आणि उत्साही करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रताप भोसले, प्रकाश भोसले यांनी केले. प्रास्ताविक डॉ. सौ. उज्वला जाधव यांनी केले. आभार आर. डी. भोसले संचालक जावली, महाबळेश्वर बाजार समिती यांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्ट चे संस्थापक किसन भोसले, मार्गदर्शक आर. डी. भोसले संचालक, जावली, महाबळेश्वर बाजार समिती. प्रकाश को. भोसले, प्रताप भोसले, प्रकाश ग. भोसले, प्रकाश सुतार, प्रशांत भोसले, वसंत भोसले, संतोष भोसले, भरत भोसले, संदेश भोसले, CA नितीन भोसले, श्रीमती नंदा भोसले, डॉ सौ उज्वला जाधव, सौ कविता सकपाळ, सौ विजया इंगवले तसेच ग्रामस्थ मंडळ तेटली, जिजामाता महिला मंडळ तेटली, माऊली मंडळ मुंबई, बाळसिद्धश्वर प्रतिष्ठान यांनी मेहनत घेतली.

न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / मेढा (जावली) 

Post a Comment

Previous Post Next Post