तक्रारदाराने १० गुंठे जमिन खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली होती, परंतु त्या जमिनाच्या सातबाऱ्यात दुरुस्ती करण्यासाठी तलाठी शरद साळुंके यांनी ५,००० रुपये लाच मागितली होती. नंतर तडजोडीअंती या रकमेची ४,००० रुपये स्वीकारण्याची शरद साळुंके यांची तयारी होती.
पथकाने शंभर टक्के खात्री झाल्यावर साळुंके यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असल्याची माहिती लाच लुचपत विभाग पोलीस अधीक्षक राजेंद्र वाघमारे यांनी दिली असून असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे
लाच लुचपत विभागाने नागरिकांना लाचविरोधी तक्रारी करण्याचे आवाहन केले आहे. तक्रारीसाठी www.acbmaharashtra.net मोबाईल ॲप फेसबुक पेज किंवा वेबसाइटवर संपर्क साधण्याची विनंती केली आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / कुडाळ (जावली)

