मारुती चिकने यांची मंडल सरचिटणीस पदी नियुक्ती

प्रतिनिधी : श्री.संजय वांगडे

कुसुंबी (जावली) : तीर्थक्षेत्र नाचणीचे गाव कुसुंबी गावचे लोकनियुक्त सरपंच श्री मारुती चिकने बापू यांची मंडल सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त सातारा येथे जिल्हा कार्यकरणी बैठक पार पडली.

    सुशासन दिनाच्या अनुषंगाने भाजपा जावली तालुक्यातील प्रतिनिधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री, नामदार जयकुमार गोरे भाऊ, जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशील दादा कदम यांचे हस्ते पद नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
श्री मारुती चिकणे (मंडल सरचिटणीस ), श्री अंकुश बेलोशे (मंडल उपाध्यक्ष ) व श्री मेघराज बेलोशे यांची जावली तालुका सोशल मीडिया संयोजक पदी नियुकी केली. 

    सर्वांचे दोन्ही मंत्री महोदय, जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा,लोकसभा संयोजक सुनील तात्या काटकर, विधानसभा संयोजक श्री अविनाश दादा कदम व जावली तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, जिल्हा सोशल मीडिया संयोजक रवींद्र लाहोटी यांनी अभिनंदन केले.व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / कुसुंबी (जावली)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने