जावली तालुक्यात गवडी गावातील परिसरात खैर लाकडाची तस्करी करणाऱ्यांवर वनविभागाची कारवाई


मेढा (जावली) : दि.23. वनविभागाकडून मिळालेल्या माहीती नुसार जावली तालुक्यातील गवडी गावातील परिसरात जातीच्या झाडाचे लाकूड तोडून तस्करी करण्याच्या उद्देशाने टेम्पोत भरण्याचे काम सुरू असल्याचे आढळून आले असता वनविभागाला माहिती मिळताच त्यांनी या तस्करांना चांगलाच धडा शिकवला आहे. 


   तस्करांनकडून वाहतूक करणाऱ्या टेम्पसह मुद्देमाल मेढा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जप्त केला आहे.



खैराच्या लाकडाची तस्करी करीत असल्याचा प्रकार मेढा वनविभागाने उघड केला आहे. या कारवाईत खैराची कापून ठेवलेली लाकडे व वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेले वाहन वनविभागाने जप्त केले आहे. आधिक तपास वनविभागाचे कर्मचारी लांडगे, चौघुले, मर्ढेकर करत आहेत.

न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / मेढा (जावली) 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने