मुले घडवण्यासाठी शिवचरित्राचा अभ्यास करा ! धर्मराज हांडे

प्रतिनिधी : श्री.लालासाहेब माने (पाटील)

बनपूरी (ता. खटाव) : स्वतःची मुले चांगल्या प्रकारे घडवण्यासाठी लोकांनी शिवचरित्राचा अभ्यास करावा, असे मत पुणे येथील प्रसिद्ध शिवचरित्रकार कीर्तनकार धर्मराज हांडे महाराज यांनी केले. बनपूरी (ता. खटाव) येथिल सामाजिक कार्यकर्ते, भारुड सम्राट साहेबराव देवकर पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 


यावेळी आ. जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे, राष्ट्रवादीचे नेते नंदकुमार मोरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रा. बंडा गोडसे, भाजपचे तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, युवानेते सोमनाथ भोसले, विशाल बागल, कॉंग्रेसचे संजयभाऊ साळुंखे, माजी पंचायत समिती सदस्य मोहनराव बुधे, मजूर फेडरेशनचे माजी संचालक जयसिंगराव जाधव तानाजीशेठ बागल, लक्ष्मणराव शिंगाडे, विनायक ठिगळे, शहाजी देशमुख, अरुण पवार, अंकुश खरमाटे, प्रल्हाद माने, एकनाथ जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.


ह.भ.प. हांडे म्हणाले, आदर्श माता महान जिजाऊंच्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराजासारखे व्यक्तीमत्व घडले. शिवाजी महाराजांनी संभाजीराजेंना लहानपणापासून कडक शिस्तीचे महत्व शिकवले. जीवनात परकीय शत्रू बरोबरच जवळच्या लोकांकडून त्रास होऊ शकतो याची पूर्वकल्पना दिली होती. यावेळी त्यांनी देवकर पाटील कुटूबियांच्या उद्योग व्यवसाय, समाजकारण, राजकारणातील चौफेर प्रगती तसेच समाजासाठी जपत असलेल्या दातृत्वाचे कौतुक केले.


माजी सरपंच रामभाऊ पाटील, उपसरपंच तानाजी पाटील यांनी स्वागत केले. विजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. धनंजय क्षीरसागर यांनी आभार मानले.


कार्यक्रमास सरपंच रविंद्र कांबळे, डॉ. राजेश देवकर, टी. के. देवकर, आत्माराम शिंदे भाऊसाहेब देवकर डी डी शिंदे शंकर देवकर भगवान देवकर प्रकाश देवकर भिमराव तुपे आबासाहेब देवकर शरद देवकर बापूराव देवकर अमर पाटोळे आदीसह महिला व भजनी मंडळ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.




न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / बनपुरी (खटाव)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने