बारामतीचे माजी प्राचार्य, मा. शंकरराव घाटगे सर यांना व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

प्रतिनिधी : श्री मंदार वैद्य

कोल्हापूर : समर्थ सोशल फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेच्या माध्यमातून प्रा. शंकरराव घाटगे यांनी अनेक रुग्णांना मधुमेहमुक्त, व्यसनमुक्त, करण्याचे उत्कृष्ठ सामाजिक कार्य केले आहे.
   त्यांच्या या सामाजिक कार्याची नोंद घेऊन संस्थेने सयाजी हॉटेल, कोल्हापूर येथील भव्य समारंभात दि. 29 सप्टेंबर, 2024 रोजी व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्याचा सन्मान केला आहे.


समर्थ सोशल फाउंडेशन व नुट्रीफील हेल्थ प्रो. प्रा. लिमिटेड ही सामाजिक संस्था आणि शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र हे सन 2015 पासून देशात व्यसनमुक्ती, मधुमेहमुक्ती, वेदनामुक्ती, रोगमुक्ती, व शिशुरक्षा अशा महत्वाच्या विषयावर सात्यत्याने कार्य करत आहे.


   संस्थेचे हे सामाजिक अभियान घरोघरी पोहचवण्यासाठी संस्थेकडे प्रशिक्षित PRO (जनसंपर्क अधिकारी ), डॉक्टर्स, सोशल वर्कर्स, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, रिटायर पर्सन, व अनेक गृहिणी हे सामाजिक कार्य करत आहेत.



न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / कोल्हापूर







टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने