कश्मिरा पवार ला पुन्हा अटक 14 कोटी 73 लाखांचा लावला चुना


सातारा : साताऱ्याची बंटी बबली जोडी म्हणून कुख्यात झालेल्या जोडीला आज सातारा शहर पोलिसांनी पुन्हा बेड्या ठोकल्या. तब्बल 14 कोटी 73 लाखांची फसवणूक केल्याची फिर्याद सातारा शहर पोलिसात दाखल करण्यात आली आहे

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सुषमा महेंद्र खामकर रा.पुणे यांना पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान यांची सचिव आणि सुरक्षा सल्लागार असल्याचे भासवून त्यांना महाराष्ट्रातील शाळांना गणवेशाचे टेंडर देण्याचे आमिष दाखवून सन 2019 ते 2022 दरम्यान तब्बल 14 कोटी 73 लाखांची फसवणूक केली
या कामी तिने भारताची राजमुद्रा असलेल्या खोट्या ऑर्डर्स तयार करून विश्वास संपादन केले या संपूर्ण प्रकरणात तिच्या सोबत गणेश हरिभाऊ गायकवाड, युवराज भीमराव झळके, राधा युवराज झळके,दशरथ चांगदेव जाधव, अनिता दशरथ जाधव,अमित भरत वायदंडे,अनिल भरत वायदंडे(मयत) सर्व राहणार सातारा यांनी संगनमत करून आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद सातारा शहर पोलिसात दाखल करण्यात आली
या पूर्वीही सातारा शहर पोलिसांनी कश्मीरा आणि आणि साथीदारांना फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली मात्र जामीन मिळाल्याने तिची सुटका झाली होती मात्र सातारा पोलीसांची पुन्हा या 14 कोटींच्या फसवणुकी प्रकरणी तिला सदरबजार सातारा येथून ताब्यात घेतले तिच्या सोबत इतर साथीदारांना हि ताब्यात घेण्यात आले 
या सर्व आरोपींवर भा द वी कलम 170, 420 465,466,467,468,469,470,471,472,473 व तंत्रज्ञान अधिनियम कलम 66(C) प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना मा न्यायालया समोर उभे केले असता पोलिसांच्या पुढील अधिक तपासाच्या मागणी नुसार पाच दिवसांचा पोलीस कोठडी सुनावण्यात आली
या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक म्हेत्रे करत असून या तपासात आणखी काही फसवणुकीचे प्रकार समोर आल्यास आश्चर्य व्हायला नको.


न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / सातारा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने