ट्रेनिंग पूर्ण करून गावात आल्यानंतर अनोखे स्वागत
कराड : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने पोलीस भरतीचा सराव केला सामाजिक कार्यात सुद्धा वैष्णवी चा सहभाग असतो कोणतेही प्रशिक्षण न घेता स्वतः नियमित प्रॅक्टिस करून जिद्द परिश्रम आणि सातत्य यामुळे यश आल्याचे तिने सांगितले आता माझी अंमलदार पदी निवड माझे शिक्षण पूर्ण करण्याचे तिचे ध्येय आहे, सेवा करत पुढच्या परीक्षा देणार आहे असे तिने सांगितले.
आजच्या मुलांचा सोशल मीडियावर जास्त वेळ जातो तो न घालवता परिश्रम व सातत्य ठेवले तर यश मिळते याचे उत्कृष्ट उदाहरण आहे, तिनं पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोला येथे प्रशिक्षण घेतले असून सध्या मुंबई ताडदेव पोलीस स्टेशन येथे सेवेसाठी रुजू झाली आहे, ती गावी आली असता तिच स्वागत भव्य ढोल ताशाच्या गजरात करण्यात आले, प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा कोर्टी माध्यमिक शिक्षण उच्च माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय उंब्रज येथे झालेल आहे तिच्या या सत्काराला विद्यालयाचे विद्यार्थी तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / कराड


