मा.श्री.अमित कदम यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदार म्हणून संधी मिळावी.

प्रतिनिधी : संजय वांगडे

जावली तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष - श्री. साधु चिकणे तसेच सातारा जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली मागणी.

मेढा (जावली) : सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून पक्ष संघटना वाढीसाठी सातारा जिल्हयाला राज्यपाल नियुक्त आमदार मिळणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यातील मतदार संघाच्या पुर्नरचनेनुसार पुर्वी अस्तित्वात असलेला जावली, महाबळेश्वर व सातारा हया मतदार संघाचे भौगोलिक रचना बदलली व जावली महाबळेश्वर हया दोन्ही डोंगरी विभागातील तालुक्याचे अस्तित्व संपुष्टात आले पुर्वीच्या मतदार संघाच्या रचनेनुसार जावली तालुक्याचे अनेक मान्यवरानी तालुक्याचे किंबहुना डोगरी विभागाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये प्रामुख्याने स्वर्गीय आमदार जी जी कदम यांचे नेतृत्व मानले गेले व 2 वेळा त्यांना मतदारांनी संधी दिली. 

स्वर्गीय आमदार जी जी कदम यांचे आशिर्वादाने व मा. ना. अजितदादा पवार साहेब यांचे मार्गदर्शनाखाली जावली सातारा विधानसभा मतदार संघातील जावली महाबळेशार तालुक्यातील जनतेवर प्रेम करणारा व त्यांच्या अडी अडचणीना कायम साथ देणारा नेता म्हणजे अमितदादा कदम होय, अमित दादानी आज पर्यंत तालुका, जिल्हा स्तरावर विविध पदे भूषवून आपल्या कामाचा ठसा निर्माण केला आहे. तरी आम्हा सर्व सातारा व जावली मतदार संघातील मतदारांची श्री अमितदादा कदम यांना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारामध्ये संधी मिळावी, जेणेकरून जावली महाबळेश्वर सातारा तालुक्यातील मतदारांना न्याय मिळेल. 

सातारा तालुका अध्यक्ष - श्री शशिकांत वाईकर , जिल्हा चिटणीस श्री प्रकाश कदम , तालुका उपाध्यक्ष - श्री विलास दुंदळे , श्री सोमनाथ कदम , अरुणबापू जवळ , सरचिटणीस श्री अशोक गोळे , चिटणीस श्री दत्तात्रय लकडे , श्री विठ्ठल पवार , उपाध्यक्ष श्री संतोष रांजणे श्री आदीत्य जगताप इत्यादी उपस्थित होते.



न्यूज मराठी लाईव्ह 

प्रतिनिधी / मेढा (जावली)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने