टाॅप गिअर जावली जोडी रनमध्ये बक्षिसांचा पडणार पाऊस

जावली रनर्स स्पोर्ट असोसिएशन कडून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी केले आवाहन.

प्रतिनिधी : संजय वांगडे 

मेढा (जावली) : टाॅप गिअर जावली जोडी रन ६ऑक्टोबर रोजी होणार असून स्पर्धेला नाव नोंदविण्याची मुदत दहा सप्टेंबर पर्यंत असणार असून या अनोख्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जावली रनर्स स्पोर्ट्स असोसिएशनचे वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेची माहिती देण्यासाठी सर्किट हाऊस मेढा येते पत्रकार परिषदेत संस्थापक अध्यक्ष नवनाथ डिगे यांनी सांगितले की, दहा किलो मीटरची ही स्पर्धा मेढा, मोहाट, पिंपरी, गांजे ते कुसुंबी व पुनः कुसुंबी ते मेढा या मार्गावर धावणार असून या स्पर्धेसाठी पुरुष - पुरुष, महिला - पुरूष व महिला - महिला अशा जोडीने सहभाग घेता येणार आहे. ही स्पर्धा १५ ते २५, २५ ते ३५, ३५ ते ४५, ४५ ते ५५ व ५५ ते ६५ या वयोगटात होणार असून जोडीतील दोन्ही स्पर्धकांच्या वयाची सरासरी काढून वयोगट ठरवला जाणार आहे. पंधरा वयोगटापर्यंतच्या मुलांसाठी चार किलोमीटरच्या फण रनचे ही आयोजन करण्यात आले आहे. 

90 जणांना विजेता होणारी एकमेव मॅरेथॉन टॉप गिअर जावली जोडी रन *मिनी काश्मीर कासपठार व जावली जोडी रन चा हंगाम हा एकच आहे 6* ऑक्टोंबर प्रत्येकाने एक रनर घडवूया आपलं कुटुंब हेल्दी बनवूया असे आवाहन केले आहे

या स्पर्धेसाठी पुणे, मुंबई, कोल्हापूर आदी ठिकाणचे स्पर्धक सहभागी होणार असून जावली तालुक्यातील स्पर्धकांना विशेष सवलत दिली जाणार आहे. 

वेन्ना नदीच्या निळ्याशार पाण्यालगत, सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगामधून मॅरेथॉनचा मार्ग असल्याने स्पर्धकांना विशेष हुरूप येतो. 

स्पर्धेसाठी *टायटल स्पॉन्सर टॉप गिअर* सातारा अजिंक्य उद्योग समूह, यशवंत हाॅस्पीटल, मिनाक्षी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल, माऊली डेव्हलपर्स, मंगलमूर्ती हॉस्पिटल , दिवेकर हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले आहे.

या वेळी RSAJ संस्थापक अध्यक्ष नवनाथ डिगे, सचिव संजय धनावडे, , सुहास पाटील, रवि शिंदे, प्राध्यापक संतोष कदम, विलास डिगे अविनाश कारंजकर आदी उपस्थित होते. 

या स्पर्धेसाठी आयोजकांनी जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन करण्यासाठी आवाहन केले आहे




न्युज मराठी लाईव्ह 

प्रतिनिधी / मेढा (जावली)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने