प्रतिनिधी : राहुल पवार
कराड: जिल्हा रुग्णालय सातारा यांचे वतीने आयोजित जिल्हास्तरीय रेड रिबन प्रश्नमंजुषा स्पर्धेत श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट कराडच्या विठामाता विद्यालयातील कुमारी अनुष्का अनिल पाटील या विद्यार्थिनींनी जिल्ह्यात द्वितीय क्रमांक तसेच कुमारी प्रणिती प्रमोद नलावडे या विद्यार्थिनींनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.
त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व सचिव श्री जयवंत पांडुरंग पाटील संस्थेचे खजिनदार श्री संजय बदियानी तसेच सर्व संचालक यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.थोरात यु. ए. यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या परीक्षेसाठी सौ पाटील पी.एस.यांनी मार्गदर्शन केले.
न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / कराड
