सातारा : महाराष्ट्र सरकार हे महिलांच्या सुरक्षितते संदर्भात सपशेल अपयश ठरलेल आहे, महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली सरकारने केवळ महिलांचे हास्य उडवलेल आहे महाराष्ट्राला कळंबा फासणाऱ्या घटना दिवसें दिवस महाराष्ट्रामध्ये घडत आहेत या व अन्य अत्याचाराला वाचा फोडण्याकरिता आज ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रामध्ये महिलांवरती होणाऱ्या अन्याय अत्याचारा संदर्भात आपण गांभीर्याने दखल घ्यावी महिलांना शस्त्र परवाना त्वरित सरकारच्या वतीने देण्यात यावा व तेही जमत नसल्यास प्रत्येक महिलेच्या सुरक्षे करिता सरकारच्या वतीने पोलीस देण्यात यावा या महाराष्ट्रामध्ये नेत्यांना गरज नसतानाही दहा दहा पंधरा बॉडीगार्ड पोलीस पुरवले जातात.
परंतु महिलांवरती वाढणारे अन्याय अत्याचार हे सरकार थांबवू शकत नाही हे या सरकारचे अपयश आहे आणि म्हणून या सरकारचा आज रोजी ऑल इंडिया पॅंथर सेनेकडून निषेध करण्यात आला आणि सरकार म्हणून तुम्ही जर का संरक्षण करत नसाल तर मग महिलांकरिता शस्त्र परवाने जाहीर करा आरोपींना कटोरात कठोर शासन करा फास्टट्रॅक कोर्टामध्ये केसेस चालवा आणि बलात्कार केलेल्या आरोपींना फासा वरती लटकवा अन्यथा इथून पुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने केले जाईल याची दक्षता आपण घ्यावी अशी विनंती निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / सातारा

