तालुकास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत भणंग प्राथमिक शाळेचे निर्विवाद वर्चस्व.

१२ खेळाडूंची जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड.

प्रतिनिधी : चंद्रशेखर जाधव

वाघेश्वर (जावली) : सातारा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांचे वतीने मेरु विद्यामंदिर वाघेश्वर येथे आयोजित जावली तालुक्यातील शालेय योगासन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भणंग या शाळेतील खेळाडूंनी १४ वर्षे वयोगटातील १४ पैकी १२ बक्षिसे जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.

१४ वर्षेखालील मुलांच्या गटांमध्ये भणंग प्राथमिक शाळेतील सहा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.त्यामध्ये प्रेम महेश भोसले याने प्रथम,अर्णव जोतीराम जाधव याने द्वितीय,विराज विशाल जगताप याने तृतीय,आयुष शांताराम जाधव याने चतुर्थ क्रमांक मिळवला.रिदमीक योगा प्रकारात संस्कार गणेश जगताप याने प्रथम क्रमांक तर आर्टिस्टिक योगा प्रकारात विराज विशाल जगताप याने प्रथम क्रमांक पटकावला.

तसेच १४ वर्षेखालील मुलींच्या गटात भणंग प्राथमिक शाळेतील सहा विद्यार्थिनींनी यश मिळवले.त्यामध्ये सिद्धी चंद्रशेखर जाधव हिने प्रथम,रिद्धी चंद्रशेखर जाधव हिने द्वितीय,पुर्वी धनंजय देशमुख हिने चतुर्थ,आर्या योगेश जाधव हिने पाचवा क्रमांक मिळवला.तसेच रिदमीक योगा गटात गायत्री संतोष जाधव हिने प्रथम तर आर्टिस्टिक योगा प्रकारात सिद्धी चंद्रशेखर जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावला.या सर्व खेळाडूंची म्हसवड ता.माण येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या विद्यार्थ्यांना योगशिक्षक डी.टी.धनावडे,क्रीडा शिक्षक अशोक लकडे,मुख्याध्यापिका आशा साळुंखे,विश्वास भिसे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

भणंग शाळेतील खेळाडूंनी शालेय योगासन स्पर्धेत मिळवलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल जावलीचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे,केंद्रप्रमुख मिलन मुळे,भणंगचे सरपंच गणेश जगताप,उपसरपंच हाफिजा मोमीन आदि मान्यवरांसह शाळा व्यवस्थापन समिती,हनुमान उदय मंडळ,ग्रामपंचायत व ग्रामस्थ मंडळ भणंग,पालक,शिक्षक यांनी अभिनंदन केले.



न्युज मराठी लाईव्ह 

प्रतिनिधी / वाघेश्वर (जावली)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने