जावली : मेढा पोलीस ठाणे हद्दीत कृष्णा सखाराम शेवते वय 90 वर्षे, सेवानिवृत्त कर्मचारी रा.कुडाळ मौजे माळ आळी ता.जावली जि.सातारा याठिकाणी दि.03/08/2024 रोजी सकाळी 08.30 वा. ते 05/08/2024 सायंकाळी 07.00 व दरम्यान फिर्यादीचे बंद घराच्या दरवाज्याचे कुलूप काढून कोणीतरी अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून घरामध्ये भिंतीवरील लाकडी कपाटाचा कडी कोयंडा काढून कपाटातील पाच तोळे वजनाची सोन्याची बोरमाळ व रोख रक्कम असे एकूण 80,000/- रूपये रोख रक्कम असा 3,30,000 रू किमतींचा मुद्देमाल घरफोडी करून चोरुन नेला आहे. खबर दिल्याने मेढा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याच्या अनुशंगाने तपास करीत असताना सदरचा गुन्हा फिर्यादी यांचा घरातून विभक्त राहणारा मुलगा निलेश कृष्णात शेवते याने केला असल्याबाबत संशय आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आलेला आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपीकडुन गुन्ह्यातील चोरीस गेलेला पाच तोळे वजनाची सोन्याची बोरमाळ तसेच रोख रक्कम 55,500/- रूपये असा एकुन 3,30,000/- रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपींसह मा.न्यायालयाचे समक्ष हजर ठेवले असता त्यास दि.9/8/2024 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली आहे.
सदरची कारवाई ही माननीय श्री.समीर शेख, पोलीस अधीक्षक सो सातारा, माननीय श्री.आंचल दलाल,अप्पर पोलीस अधीक्षक सो सातारा, माननीय श्री.बाळासाहेब भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांचे मार्गदर्शनाखाली केलेली असून सदर कारवाई मध्ये सपोनि श्री.पृथ्वीराज ताटे, मेढा पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस फौजदार श्री.विकास गंगावणे,श्री.विजय शिंगटे,पो.हवा.शिंदे , पो.हवा.माने पो.कॅा.शेख,पो.कॅा.काळे, पो.कॅा.वाघमळे, यांनी सहभाग घेतलेला आहे.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / मेढा (जावली)
