पुणे :- महाडिबीटी पोर्टल वरील Right To Give Up टॅब वर अनावधानाने क्लिक केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज बाद झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने या प्रश्नाबाबत मार्ग काढण्यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चा संघटनेद्वारे दि.१३/०५/२०२४ रोजी राज्यभरातून ३६ जिल्ह्यातून मा. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले होते त्यानंतर दि.१६/०५/२०२४ रोजी मा. सहआयुक्त समाजकल्याण पुणे यांनी महाडिबीटी महाआयटीचे प्रकल्प व्यवस्थापक यांना पत्र काढून ज्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती नजरचुकीने RIGHT TO GIVE UP झाले आहेत त्यांचे अर्ज पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
मा. सहआयुक्त समाजकल्याण महाराष्ट्र राज्य यांनी पत्र पाठवुनही महाआयटी व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज पूर्ववत न केल्याने अनेक महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना फी भरा अन्यथा तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही, हॉल तिकीट दिले जाणार नाही अशा सक्त सूचना दिल्या गेल्याबाबतच्या तक्रारी भारतीय विद्यार्थी मोर्चा संघटनेकडे प्राप्त झाल्या होत्या ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थी आपले शिष्यवृत्ती अर्ज पूर्ववत झाले नाही तर आपल्याला परीक्षेला बसू दिले जाणार नाही या भीतीने मानसिक तणावाखाली असल्याने या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या राज्य स्तरीय शिष्टमंडळाने मा. सहआयुक्त समाजकल्याण पूणे यांची आज दि.२१/०५/२०२४ रोजी भेट घेतली.
मा. सहआयुक्त समाज कल्याण यांचेसमोर राज्यभरातील विद्यार्थ्यांची परिस्थिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली यावर मा. सहआयुक्त समाजकल्याण यांनी विद्यार्थी मोर्चाच्या निवेदनाचा स्वीकार करून आजच याबाबत पत्र काढून कोणत्याही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी न अडवण्याच्या सक्त सूचना देण्याचे व ज्या महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांचे जणीवपूर्वक शैक्षणिक नुकसान केल्यास महाविद्यालयांवर कारवाई करण्याचे मान्य केल्यावरच भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी समाज कल्याण कार्यालय सोडले. यावेळी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मा. जितेंद्र भोसले, भारतीय विद्यार्थी छत्रा प्रकोष्टच्या प्रदेश अध्यक्षा मा. श्रद्धा जैस्वार, भारतीय विद्यार्थी छात्रावास संघांचे राज्य कार्याध्यक्ष मा. किरण कांबळे, भारतीय विद्यार्थी मोर्चाचे संघटक महासचिव मा. संकेत कासारे, इंडियन रिसर्च स्कॉलर्स असोसिएशनचे प्रदेश अध्यक्ष मा. संदेश कांबळे, भारतीय विद्यार्थी मोर्चा पुणे चे जिल्हाध्यक्ष मा. सोमेश गाडेकर, मा.भारतीय विद्यार्थी मोर्चा कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष मा.प्रथमेश कांबळे, भारतीय बेरोजगार मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष मा. शिवशरण शिंगे, भारतीय विद्यार्थी मोर्चाचे मुंबई चे प्रचारक इंजिश जैस्वार आदी कार्यकर्ते या चर्चेसाठी उपस्थित होते.
न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / श्री.राहूल पवार
पुणे
