कराड विद्यानगर येथील शेकडो अकॅडमी चा बाजार गुंडाळणार बारावीचा निकाल कमी लागल्याने पालकांनी केली स्वयंघोषित शिक्षकाची केली धुलाई

 


खाजगी अकॅडमी नावाखाली कोट्यवधींचा गोरख धंदा......

शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अकॅडमीच्या रूपाने सुरू झालेली कीड रोखण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष टास्क फोर्स नेमून खाजगी अकॅडमी वर त्वरित बंदी घालून लाखो रुपये कमावणाऱ्या डुप्लिकेट शिक्षकांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्यास बाबत निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

कराड शहरालगत असलेल्या विद्यानगरी ची महती शैक्षणिक क्षेत्रात देशभर असताना गेल्या काही वर्षापासून खाजगी अकॅडमीचे अक्षरशः पेव फुटले आहे, पालकांच्या कडून बेसुमार फी गोळा करून शिक्षण क्षेत्रातील अवैध अकॅडमी बहाद्दरांच्या आता बाजार गुंडाळू लागला असून, दहावी, अकरावी व बारावी साठी लाखो रुपये पालकांच्या कडून फी घेऊन मुलांचे मार्क्स वाढवून देतो, परीक्षेला चांगले महाविद्यालय पाहून देतो. अशा खोट्या बतावण्या करून पैसे लुबाडणाऱ्या बोरूबद्दरांचा आता पालकांनीच बंदोबस्त करण्यास सुरुवात केली आहे. सध्या प्रत्येक अकॅडमी मध्ये येऊन बारावीच्या विद्यार्थ्यांचे पालक जाब विचारत आहेत मात्र तेरे भी चूप... आणि मेरी भी चूप.... असा प्रकार विद्यानगर मध्ये सुरू आहे.

नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला मोठ्या मोठ्या गोड गोड गप्पा मारून विद्यानगरीमध्ये मोठे मोठे बोर्ड लावून जाहिरात बाजी करणाऱ्या अकॅडमीच्या मालकांच्यावर (स्वयंघोषित शिक्षकांच्यावर) आता तोंड लपवण्याची वेळ आली आहे. शिक्षणाचा बाजार मांडून लाखो रुपये कमावणाऱ्या डुप्लिकेट शिक्षक म्हणून मिरवणाऱ्या या प्रवृत्तीला वेळीच ठेचण्याची गरज आहे.
बारावीचा निकाल अत्यंत कमी लागल्याने याच बोरोबद्दरांनी कुठेही गाजावाजा न करता बोर्ड न लावता गुपचूपीत पुन्हा एकदा प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. खोट्या बतावण्या करून लुबाडणाऱ्या बनावट शिक्षकांच्या टोळी पासून पालकांनी सावध राहावे. विद्यानगरीत होत असलेल्या या प्रवृत्तीला पालकांनी खतपाणी न घालता आपल्या पाल्यांना योग्य ते महाविद्यालय निवडून तेथेच प्रवेश प्रक्रिया घेऊन योग्य ते मार्गदर्शन करण्याची गरज आहे. सध्या विद्यानगर येथे 70 ते 80 अकॅडमी कार्यरत असून चुकीच्या पद्धतीने पालकांना सांगून लाखो रुपये फीमार्फत घेण्याचे उद्योग सुरू आहेत. याबाबत सातारा जिल्हाधिकारी व शिक्षण विभागाने देखील लक्ष देणे गरजेचे आहे.


न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / कराड 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने