महाराजा शिवाजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज कुडाळ या विद्यालयाची इयत्ता दहावीच्या निकालात यशाची परंपरा कायम

 


महाराजा शिवाजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज कुडाळ या विद्यालयाची इयत्ता दहावीच्या निकालात यशाची परंपरा कायम ठेवली मार्च 2024 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये एकूण 75 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते पैकी 74 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे 20विद्यार्थी आहेत. तर 80 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे 18 विद्यार्थी आहेत 70 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे 18 विद्यार्थी आहेत तर 40 ते 60 टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी 18 आहेत.

विद्यालयाचा निकाल ९८.६६% लागलेला असून यावेळचा निकाल हा संख्यात्मक नसून गुणात्मक लागलेला आहे.

गुणानुक्रम पुढीलप्रमाणे 

प्रथम

 *पवार जान्हवी संतोष 96.00%* 

द्वितीय

पवार देवांग प्रदीप 95.20%

मणेर सुहान जावेद 95.20%

तृतीय

जाधव वेदांत विकास 95.00%


सेमी माध्यमाचा 100% निकाल तर 

मराठी माध्यमाचा 94.77% निकाल लागला आहे.

पालक व हितचिंतक यांनी विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला आहे.

जावली तालुक्यातील ISO मानांकित व शैक्षणिक क्षेत्रात वेगळा ठसा निर्माण करणारे संस्कार केंद्र आहे.

कला, क्रीडा व NNMS स्कॉलरशिप , चित्रकला ग्रेड परीक्षा यामध्ये उज्ज्वल यशाची परंपरा विद्यालयाने कायम ठेवली आहे.

या यशात प्राचार्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शालेय सल्लागार व विकास समिती, शाळा व्यवस्थापन समिती, कुडाळ व कुडाळ पंचक्रोशीतील ग्रामस्थ या सर्वांचे सहकार्य मिळाले आहे


न्यूज मराठी लाईव्ह 

कुडाळ / जावली

श्री.विलास दरेकर (सहसंपादक)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने