तीर्थक्षेत्र कुसुंबी येथे आज पासून वाहनांना प्रवेश शुल्क लागू

 


प्रतिनिधी / संजय वांगडे

कुसुंबी : ग्रामपंचायत कुसुंबी तालुका जावली जिल्हा सातारा यांचेकडून आज पासून वाहनांना प्रवेशासाठी लहान वाहनास 30/- रुपये तर मोठ्या वाहनास 50/- रुपये वाहन प्रवेश शुल्क पावती आकारण्यात येणार असल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच मारुती चिकणे तसेच उपसरपंच निवृत्ती मोरे यांचेकडून देण्यात आली. श्री काळेश्वरी देवीच्या दर्शनासाठी अनेक भाविक भक्त येत असतात मंदिराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहावा यासाठी हा कर आकारण्यात आलेला आहे. श्री काळेश्वरी देवीची यात्रा झाल्यावर अनेक भाविक भक्त देवीच्या दर्शनाला येत असतात आल्यावर दर्शन झाल्यावर भोजनाचा कार्यक्रम मंदिराच्या परिसरातच केला जातो त्यामुळे मंदिराच्या परिसरात अनेक प्रकारचा कचरा साठला जातो. भाविक भक्तांनी दर्शन करून नैवेद्य दाखवल्यावर आपला असणारा कचरा,प्लॅस्टिक पिशवी तसेच इतर कचरा कचरा कुंडीतच टाकावा मंदिराच्या आजूबाजूस कुठेही फेकून न देता एका ठिकाणीच टाकावा असे आवाहन ग्रामपंचायत मार्फत यात्रेकरूंना करण्यात आले आहे . हा कर आकारण्यासाठी पहिल्याच दिवशी लोकनियुक्त सरपंच मारुती चिकणे, उपसरपंच निवृत्ती मोरे,ग्रामसेविका सौ.रुपाली धाराशिवकर, काळेश्वरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रामदास वेंदे,पोलीस पाटील एकनाथ सुतार, ग्रामपंचायत मा. सदस्य सुभाष चिकने, नामदेव चिकने, विठ्ठल चिकने,आत्माराम आखाडे,शशिकांत चिकणे, तसेच गावातील इतर ग्रामस्थ उपस्थित होते.


न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / कुसुंबी (जावली)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने