पुस्तकांना मित्र बनवूया कराडच्या विठामाता विद्यालयाचा अनोखा उपक्रम

 

परीक्षा संपल्यानंतर मुलांना दीर्घकाल सुट्टी असल्यामुळे पुस्तकांचे दार उघडून ज्ञानाचा खजिना शोधावयाचे मुले काही अंशी विसरूनच जातात. त्यांना वाचनाची, लेखनाची सवय लागावी पुस्तके मित्र, मार्गदर्शक व प्रेरणादायी स्तोत्र बनावे या दृष्टीने श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट,कराडच्या विठामाता विद्यालय वाचन चळवळ हा उपक्रम राबवत आहे यासाठी विद्यालयात पूरक वाचनासाठी शालेय ग्रंथालय या व्यतिरिक्त प्रत्येक वर्गाचे ग्रंथालय तयार करण्यात आलेले आहे. विद्यार्थिनी वाढदिवसानिमित्त भेट म्हणून दिलेली पुस्तके शालेय किंवा वर्ग ग्रंथालयामध्ये जमा केली जातात. वर्गात प्रत्येक विद्यार्थिनीस वाचनास उपलब्ध करून दिली जातात. विद्यार्थिनींनी जास्तीत जास्त पुस्तके हाताळावीत व वाचन करावे या दृष्टिकोनातून वर्ग ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे. तसेच इ.5 वी ते इ 12 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी मधून जास्तीत जास्त पुस्तके वाचणाऱ्या तीन विद्यार्थिनींना विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सौ शैलजा मुकुंद सबनीस यांच्यामार्फत वाचन प्रेरणा पुरस्कार दिला जातो. तसेच विद्यालय यंदा नवीन उपक्रम राबवत आहे. विद्यालयातील ज्या विद्यार्थिनी पुढील इयत्तेत गेलेल्या आहेत त्यांची क्रमिक पाठ्यपुस्तके निकालाच्या दिवशी जमा केली जातात व नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना तसेच मागील इयत्ता तील विद्यार्थिनींना दिली जातात याचा उद्देश वाचन हा मनोरंजनाचा झरा बनावा व विद्यार्थी सतत अभ्यासाच्या वातावरणात राहावा असा आहे. हा उपक्रम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ उषा थोरात व विद्यालयाच्या सर्व सहकारी शिक्षिका-शिक्षक यांच्या कल्पनेतून साकार होत आहे. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट कराडचे अध्यक्ष व सचिव माननीय श्री जयवंत पाटील व खजिनदार माननीय श्री संजय बदियाणी साहेब यांचे मार्गदर्शन लाभत आहे.



न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / श्री. राहुल पवार 
कराड

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने